भडगाव। शहरासह तालुक्यात महसुल, नगरपरिषद व वनविभागाच्या आशिर्वादाने अवैध रित्या विटभट्ट्याच्या माध्यमातुन नागरिकांचा आरोग्याशी खेळले जात असल्याचा आरोप परीसरातील नागरिकांकडुन होत आहेत. तालुक्यात केवळ 3 विटभट्टी धारकांना रितसर परवानगी मिळाली असल्याचे महसुल विभागाकडून माहीती मिळाली असुन 49 अर्जांपैकी 46 विटभट्टीधारक तालुक्यात परवानगी न घेता तर काहींनी अर्ज न दाखल करता अवैध रित्या सर्रासपणे विटभट्ट्याचे कारखाने सुरू आहेत. या विटभट्ट्यांमुळे नागरिकांचे आरोग्याचा प्रश्न उपस्थितीत होत असुन दमा, फफ्फुसांसह आदी रोगांना नागरिकांना सामोरे जावे लागत असल्याचे बोलले जात आहे. परंतु याकडे तहसिलदार व नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी हेतु सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे.
तालुक्यात 26 विटभट्टया अवैध
शहरासह तालुक्यातुन 49 अर्ज दाखल मात्र 3 विटभट्टी धारकांनाच परवानगी दिली आहे. बाकीचे अर्ज मंडळ अधिकारीच्या चौकशीच्या फेर्यात अडकले विटभट्ट्या मात्र सुरु आहेत. नगरपरिषदेच्या हद्दित दब्बल 20 तर तालुक्यात इतर ठिकाणी 26 अवैध रित्या विटभट्टी सुरु आहेत. पेडगाव 1, कजगाव 1, महिंदळे 1 असे 3 विटभट्टी धारकांनाच परवानगी मिळाली आहे. शिंदी 2, गिरड 7, गुढे 2, कजगाव 6, निंभोरा 5, पिंपरखेड 1, गोंडगाव 1, महिंदळे 1, मांडकी 1, भडगाव 13 तर टोणगाव 7 असे तालुक्यात 46 विटभट्ट्या प्रशासनाच्या आशिर्वादाने सुरु आहेत. पुर्वी विटभट्ट्यांमध्ये कोळसा वापरला जायाचा मात्र सर्रास वृक्षतोड करुन लाकुडाचा मोठ्या प्रमाणात जाळले जात असुन पर्यावरणाचा र्हास होतोय परंतु याकडे वनविभागाने देखिल आर्थिक दुर्लक्ष केल्याचा आरोप निसर्ग प्रेमिकडून होत असुन वनविभागाचा कर्मचारी न चुकता साँ मिल व विटभट्टीला सकाळ संध्याकाळ भेट देवुन हिशोब ठेवतो असे एका वृक्ष तोड करणार्या कडुन नाव न सांगण्यावरून समजते. शहरात नगरपरिषदेने आजपर्यंत एकाही विटभट्टी धारकास नाहरकत दाखला दिलेला नाही. तरी देखिल शहरात राजरोसपने भर वसाहतीत विटभट्ट्या सुरु असुन धुराने प्रदुषण होवुन नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे.
प्रदुषणासह आरोग्याला धोका
यशवंतनगर भागात नागरिकांना क्षारयुक्त पाण्याचा व प्रदुषनचा सामना करावा लागत आहे. सगळ्यात जास्त शहरासह तालुक्याला प्रदुषनाचा प्रश्न गंभीर झाला आहे परंतु महसुल विभाग दंड करुन महसुलीत वाढ करायचा हा एकमेव ध्येय बाळगुन नागरिकांच्या आरोग्याचा खेळ मांडला आहे.सकाळी व संध्याकाळी माँर्निक साठी गेलेल्यांना प्रदुषनाचा सामना करावा लागत आहेत. विटभट्टी मधुन निघणारा वायु मुळे नागरिकांना अस्थमा,फुफ्फुसाचे, हृद्यविकारासारखे अनेक आजार होवु शकतात. परंतु महसुल, नगरपरिषद व वनविभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप होत असून प्रशासन काय कायकार्यवाही करणार याकडे लक्ष लागुन आहे.