भडगाव तालुक्यातील पहिल्या टप्यात 4 गावांची निवडणूक

0

भडगाव । तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीची मुदत संपत येत असुन टप्या टप्प्यात या ग्रामपंचायतीची निवडणूक घेण्यात येणार आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या पहील्या टप्यात कजगाव, कोळगाव, निंभोरा, पथराड या 4 गावातील निवडणूक घेण्यात येत आहे. वार्ड रचना आरक्षण मतदार याद्याचे काम पुर्ण झाले आहे. यावेळी सरपंच निवड थेट जनतेतून होणार असल्याने निवडणुका लक्ष वेधी ठरणार असुन शासनाने सरपंच निवड थेट जनतेतून हा घेतलेल्या निर्णयामुळे घोडे बाजाराला आळा बसणार, गावातील विकासात्मक कामासाठी चालना मिळणार आहे. प्रत्येक राजकीय पक्षाने आपलाच पक्षाच काम करणारा सरपंच निवडून यावा यासाठी फिंल्डीग लावतांना दिसुन येत आहे.मात्र उमेदवारांना कोणत्याही राजकीय पक्षाचं चिन्ह मिळणार नसुन निवडणूक आयोगाने दिलेल्या चिन्हावरच उमेदवारांना निवडणूक लढवाविवी लागणार त्यामुळं लोकनियुक्त सरपंचाला राजकीय पक्षाच शिक्का लागणार नाही.

7 ऑक्टोबर रोजी मतदान
कजगाव ग्रामपंचायत 17 सदस्यपैकी 9 महीला 8 पुरुष सरपंच आरक्षण ना.मा.प्र.महीला मतदार 5234 पैकी 2465 महीला 2769 पुरुष. कोळगाव 11 सदस्य 6 महीला 5 पुरुष सरपंच आरक्षण सर्वसाधारण मतदार 2416 पैकी 1168 महीला 1248 पुरुष आहेत. निंभोरा 9 सदस्य पैकी 5 महीला 4 पुरुष सरपंच आरक्षण ना.मा.प्र.1953 मतदार पैकी 927 महीला 1026 पुरुष तर पथराड ग्रामपंचायत 7 सदस्य 4 महीला 3 पुरुष सरपंच आरक्षण ना.मा.प्र.महीला मतदार 1509 पैकी 722 महीला 787 पुरुष उमेवारांना अर्ज ऑनलाईन भरावा लागणार असुन उमेदवारांना शौचालय असल्याचा,ग्रामपंचायत बाकी व ठेकेदार नसल्याचा दाखला जोडावा लागणार आहे. तसेच प्रत्येक उमेदवाराला खर्च दाखविण्यासाठी नविन बँक खाते पासबुक जोडावे लागणार आहे.22 सप्टेंबर पर्यंत फार्म भरण्याची मुदत आहे. 7 ऑक्टोबर रोजी मतदान करायचं, निकाल 9 ऑक्टोबरला लागणार असल्याची माहीती नायब तहसिलदार मुकेश हिवाळे यांनी दिली.