भडगाव तालुक्यातील रस्त्यांची दयनिय अवस्था

0

भडगाव। तालुक्यात नेहमी प्रमाणे रस्त्यांची अवस्था अतिशय दयनिय झालेली होती. नादुरुस्त व खड्डेमय रस्त्यामुळे अनेक छोटे मोठे अपघात झाले असल्याचे सर्वसामान्य मधुन बोलले जात असुन दर वर्षाप्रमाणे यावेळी देखिल रस्ते दुरुस्तीचे काम होत आहे. रस्ता दुरुस्तीचे काम म्हणजे जखमेवर फुंकर घालण्याचे काम संबंधित विभागाकडून होत असल्याचे परीसरातील नागरीकांकडून होत आहे. भडगाव तालुका हा पाचोरा, पारोळा, चाळीसगाव, एरंडोल या चार तालुकांना जोडणारा तालुका आहे. मात्र या तालुक्यातील रस्त्यांची अवस्था दर वर्षाप्रमाणे खड्डांच्या बाजुला खड्डाच राहणार का पावसाळा संपला की रस्ता दुरुस्तीचा पुळका आणायचा, हिच कामे चार महिण्याच्या पावसाच्या पाण्यात वाहुन पुन्हा खड्डे उघडे पडतात. या रस्त्यात वाहन चालवणे म्हणजे एक प्रकारे तारेवरची कसरत करावी लागते.

काम पुर्ण करण्याची मागणी
निष्कृष्ट दर्जांचे रस्त्यांची कामांची प्रचीती वाहनधारकांसह नागरिकांना दरवर्षी येत असल्याचे बोलले जात आहे.तालुक्यातील नविन रस्त्यांची व दुरुस्तीच्या नावाखाली केलेल्या कामांची संबंधिताची विभागीय चौकशी होवुन कार्यवाहीची मागणी होत आहे. मागिल वर्षी 2016 सप्टेंबर महिण्यात गाजावाजा करुन रस्त्यांचे लोकार्पण व भुमीपुजन करण्यात आले होते. त्यापैकी काही लोकार्पण झालेल्या रस्त्यांचे पुन्हा दुरुस्तीचे काम सुरु असुन लोकार्पण झालेल्या रस्त्यांचे काम झाले होते का? असा प्रश्न उपस्थितीत केला जात असुन नागरिकाकडून चौकशीची मागणी होत आहे.