भडगाव तालुक्यात शिवार संवाद सभा उत्साहात

0

भडगाव । तालुक्यातील वडजी व पांढरद येथे 29 मे रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्ष, केंद्र सरकारचे तीन वर्ष व राज्य सरकारच्या अडीच वर्षे पूर्ण झाले या निमित्ताने सरकारच्या शेतकरींसाठी ज्या विविध योजना आहेत. त्या शिवार संवाद सभा या कार्यक्रमाअंतर्गत भाजयुमो जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक अमोल पाटील यांनी शेतकर्‍याना माहिती दिली. यावेळी तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील व सरचिटणीस अनिल पाटील, सचिन पाटील व सोशल मिडिया प्रमुख शुभम सुराणा उपस्थित होते.

विविध विषयांवर झाली चर्चा
गट शेती, जलयुक्त शिवार, शेतरस्ते, जलसिंचन, पिकविमा, सूक्ष्मसिंचन, मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त तलाव गाळयुक्त शिवार योजना, बिटी कॉटन 100 रुपये कमी, पंतप्रधान घरकुल योजना, संजय गांधी योजना, स्वच्छ भारत अभियान, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अशा विविध योजनांची माहिती देवून त्या गावातील प्रमुख समस्याही जाणून घेतल्या यावेळी वडजी येथे विजय पाटील, माजी उपसरपंच लखीचंद परदेशी, उपसरपंच राजेंद्र पाटील, माजी उपसरपंच राजेंद्र मोरे, ग्रा प सदस्य शांताराम कुंभार, नितीन वाघ, राजेंद्र पाटील, अतुल पाटील, पपेश पाटील, ग्रा प सदस्य नाना मालचे, जोतीराम मोरे, रामाभाऊ धनगर, गणेश पाटील, दगा पटेल, भिकन पाटील, बाजीराव पाटील, कृष्णा पाटील व दिलीप पाटील तर पांढरद येथे संजय पाटील, दिलीप पाटील, मच्छिद्र पाटील, भाऊसाहेब पाटील, ग्रा प सदस्य अनिल पाटील, मच्छिद्र खैरे, बाळासाहेब पाटील, रमेश पाटील, योगेश पाटील, भागवत पाटील सह असंख्य शेतकरी उपस्थित होते.