भडगाव । जिल्हा परीषदेच्या तीन गटात 10 उमेदवार तर पंचायत समितीच्या सहा गणातून 22 उमेदवार रिंगणात उभे होते. निवडणुकीत गटात व गणात तिरंगी लढत होती. तीन गटातून शिवसेनेला दोन तर राष्ट्रवादीला एका जागेवर विजयी झाले. आणि सही गणातून शिवसेना 3, भाजपा 2, राष्ट्रवादी एक असे पक्षिय बलाबल असून शिवसेना आता सभापती पदासाठी कुणाची मदत घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
तीन गटातील उमेदवारांना मिळालेली मते
कजगाव-वाडे गटातून किर्ती जालिंदर चित्ते (7059) शिवसेना विजयी झाले तर वनिता विजय गायकवाड (6683) भाजपा, दुर्गा अशोक सोनवणे (5570) राष्ट्रवादी यांचा पराभव झाला आहे. गिरड-आमडदे गटातून स्नेहा नाना गायकवाड (8120) राष्ट्रवादी विजयी झाले तर नम्रता फकीरचंद सोनवणे (6487) शिवसेना आणि शीतल प्रमोद सोनवणे (5700) मते पडून पराभ झाला. गुढे-वडजी गटातुन कल्पना संजय पाटील शिवसेना विजयी 9556, अंकिता किशोर पाटील (3028) भाजपा, शकुंतलाबाई पुंडलीक पाटील (7574) राष्ट्रवादी आणि सारीका संजय सोनवणे (218) अपक्ष पराभव यांचा पराभव झाला.
सहा गणातील उमेदवारांना मिळालेले मते23212
कजगाव गणात डॉ. अर्चना पाटील (3627) भाजपा विजयी झाल्या तर कोकीळा माधवराव पाटील (2854) शिवसेना, वंदना दिलिप पाटील (3390) राष्ट्रवादी यांचा पराभव झाला.
वाडे गणात रावण श्रीपत भिल (3285) शिवसेना हे विजयी झाले तर प्रदिप भिल अपक्ष (784), संजय देवचंद भिल (3077) भाजपा, देवाजी मोतीलाल सोनवणे (2361) राष्ट्रवादी पराभव यांचा पराभव झाला.
गुढे गणात हेमलता विकास पाटील (5061) शिवसेना विजयी झाल्यात तर सायजाबाई ओंकार पाटील (4182) राष्ट्रवादी आणि संगीता सुरेश पाटील(1536) भाजपा यांचा पराभव झाला.
वडजी गणात रामकृष्ण पाटील (4390) शिवसेना यांचा विजय झाला तर बाबुराव पाटील (2870) राष्ट्रवादी, पृथ्वीराज राठोड (90) अपक्ष आणि पुरुषोत्तम अभिमन सोनवणे (2174) भाजपा यांचा मोठ्या अंतराने पराभव झाला.
गिरड गणात प्रताप सोनवणे (3618) राष्ट्रवादी विजयी अनिल काळे (376) अपक्ष, निवृत्ती बाविस्कर (3446) शिवसेना, श्रावण लिंडायत (2515) भाजपा यांचा पराभव झाला.
आमडदे गणात अलकाबाई पाटील (3841) भाजपा विजयी झाल्या आहे तर आशाबाई पाटील (107) अपक्ष, उज्वला पाटील (2807) शिवसेना, भारती पाटील (3628) राष्ट्रवादी पराभव असे निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवारांना मते मिळाली आहेत.