भडगाव । पंचायत समितीत एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे सत्तेची चावी कोणाकडे असणार का ईश्वर चिठ्ठीने सत्ता स्थापन होणार हे येणारा काळच ठरवणार आहे. पंचायत समितीच्या सहा जागा आहेत. त्यापैकी शिवसेनेला तीन, भाजपा दोन तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक असे पक्षीय बलाबल असुन शिवसेना व भाजपाकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जात आहे.शिवसेनेकडून हेमलता विकास पाटील तर भाजपाकडून डॉ.अर्चना पाटील हे सभापती पदासाठी इच्छुक आहेत.राष्ट्रवादीची भुमिका निर्णायक ठरवणार आहे.
मुंबई महानगरपालिकासाठी शिवसेनेला पाठींबा दिला आहे. राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठींबा दिला तर शिवसेनेची सत्ता पंचायत समितीत येऊ शकते. भाजपाला पाठींबा दिल्यावर इश्वर चिठ्ठीने सत्ता स्थापन होवु शकते.युती झाली तर सेना व भाजपात सभापती पद हे पहीले तीन वर्षे सेना कडे नंतर दोन भाजपाकडे किंवा शिवसेना राष्ट्रवादीला पाच वर्षे उपसभापती देवुन पुर्ण पाच वर्षे सभापतीपद स्वतःकडे ठेवून राजकीय खेळी खेडू शकते. भाजपा देखील राष्ट्रवादीला सोबत घेवुन इश्वर चिठ्ठीने नशिब आजमावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.