भडगाव पोलीस स्टेशनला शांतता कमेटीची बैठक

भडगाव (प्रतिनिधी) 

भडगाव

गणेश उत्सवांमध्ये सामाजिक एकीकरण साधत जनजागृति, उपक्रम यावर मंडळांनी भर देऊन पुढे एक गाव एक गणपती संकल्पना पुढे आणावीत . यंदा हिंदू मुस्लिम बांधवांचे सन एकत्रित येत असल्याने शंताते ते पार पाडावे. असे आवाहन सहाय्यक पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांनी केले.

आगामी येणाऱ्या गणेशोत्सवासह विविध सणांच्या पार्श्वभूमीवर भडगांव तहसिलदार मुकेश हिवाळे यांच्या दालनात आज दि. १ रोजी उपविभागिय पोलिस अधिकारी अभयसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली .

यावेळी तहसिलदार मुकेश हिवाळे, पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील,भडगांव नगरपालीकेचे मुख्याधिकारी रविंद्र लांडे, महावितरणचे अभियंता रविंद्र राऊळ, अभियंता दहिवले, पोलीस उप निरीक्षक डोमाळे, गोपनीय शाखेचे कर्मचारी स्वप्नील चव्हाण , विलास पाटील, पोलीस पाटील भुषण पाटील यांच्या सह शांतता कमिटीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी अभयसिंह देशमुख यांनी भडगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गणेश मंडळांचे पदाधिकार्यांन सह सर्व समाज बांधवाना आगमी येणाऱ्या गणेश उत्सवासह विविध सण शासनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करून शांततेत साजरा करावा. आपल्या मंडळाच्या माध्यमातून जनजागृती व समाजाला प्रबोधनात्मक देखावे कार्यक्रम साजरे करावे व समाज एकजुटीचे संदेश द्यावे असे शांतता कमिटीच्या बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व धर्मिय पदाधिकारी व समाज बांधवांना त्यांनी यावेळी आवाहन केले. दरम्यान गणेश विसर्जन व ईद- ए – मिलाद ‘ एकाच दिवशी असल्याने सामाजिक सलोखा राखत उत्सव शांततेत पार पाडावे असे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केले. मंडळांच्या वतीने बैठकीत बन्सी परदेशी, जाकिर कुरेशी, नाना हाडपे, मिलिंद बोरसे, अजय चौधरी, इम्रान अली , नरेंद्र पाटील, सुनील कासार, सुधीर अहिरे, राजू शेख, ललित धनगर, आदींनी मंडळांच्या समस्या मांडत मत व्यक्त केले. उत्सवा दरम्यान विज पुरवठा खंडित होऊ नये. विसर्जन मार्गातील विज तार उंच करावेत, अडत असलेले रस्त्यावर वाढलेली झाड्यांची छाटणी करावी, रस्त्यांची काही ठिकाणीं दुरुस्ती करावी आदी मागणी करण्यात आली.

यावेळी तहसिलदार मुकेश हिवाळे यांनी आगामी येणाऱ्या गणेश उत्सवासह विविध सण शासनाने लागू केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून साजरे करावे . मंडळांनी शासनाचे उपक्रमात सहभाग घेऊन

सामाजिक उपक्रम राबवावेत असे आवाहन केले.

तर पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी कायदा व सुव्यवस्थेचे काटेकोरपणे पालन करून कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवावी. असे सांगितले . बैठकीस भडगांव पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकारी सह शांतता कमिटेचे पदाधिकारी, पत्रकार व विविध समाज बांधव उपस्थित होते. सुत्रसंचलन गोपनीय शाखेचे स्वप्नील चव्हाण यांनी तर आभार पोलीस पाटील भूषण पाटील यांनी मानले.