भडगाव बसस्थानकासमोरील मातीची परस्पर विक्री

0

भडगाव । अतिक्रमणा नंतर गटारीच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून राहिलेल्या जागेवर ‘जैसे थे’ त्याचठिकाणी पुन्हा अतिक्रमण स्थित होतांना दिसून येत आहे. भडगाव बसस्थानक समोरील बाजून 2 बाय 4 मीटरच्या मोठया नाल्याचे काम सुरू आहे. त्यातून मोठया प्रमाणावर माती बाहेर काढण्यात आली. मात्र ही माती विना परवानगी ठेकेदाराने विक्री केली असून स्थानिक बांधकामाचे काही कर्मचारी त्यांची झाक झाकत असल्याचा प्रकार समोर आला आहे. 23 मे रोजी भडगाव बस स्थानकासमोर जेसीबी मशीनने नाली कामासाठी खोदकाम करण्यात आले. त्यातून निघालेली शेकडो ब्रास माती रात्री जेसीबी मशीनने कोरून ट्रॅक्टरने पसार करण्यात येत होती.

ही माती अनाधीकृत वाहतुक होत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता यांच्या ही बाब लक्षात आणून दिल्यावर त्यांनी ठेकेदार काय करणार? तो योग्य काम करतोय? माती विकली तर काय झालं? तो माल टाकणार कुठे अशी उत्तरे देत ठेकेदाराची बाजू ओढली असून विना परवाना माती विकणारे ठेकेदार व ठेकेदारी पोसणार्‍या कर्मचार्‍यांची चौकशी करण्याची मागणी होत आहे. ही माती वाहतुक योग्य होती. तर रात्रीच माती वाहतुक बंद का केली गेली.10 मिनिटांत जेसेबी व वाहतुक करणारे ट्रक्टर गायब झालेत. हि माती वाहतुक योग्य होती तर वाहतुक पसार का झालेत. असे अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थितीत होत आहेत.