भडगाव बस स्थानकातून महिलेची पर्स लांबवली !

Taking advantage of the crowd, the wallet containing 41 thousand was extended : Bhadgaon bus station type भडगाव : भडगाव बस स्थानकात गर्दीचा फायदा घेत भामट्याने 41 हजार रुपयांचा ऐवज असलेली पर्स लांबवली. ही घटना रविवारी दुपारी दोन वाजता घडली. या प्रकरणी अनोळखी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

गर्दीचा फायदा घेत पर्स लांबवली
भडगाव बस स्थानकावरून रविवार, 23 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास स्वाती विजय पाटील (34) या गावी जाण्यासाठी बसस्थानकावर आल्यानंतर चोरट्यांनी त्यांची पर्स लांबवली. पर्समध्ये सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 41 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल होता. महिलेने भडगाव पोलीस स्थानक गाठत अनोळखी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार विलास पाटील करीत आहे.