भडगाव भाजप तर्फे आयोजित शिबीरात 53 स्वयंसेवकांनी केले रक्तदान 

भडगाव (प्रतिनिधी) राष्ट्र नेता ते राष्ट्रपिता “सेवा पंधरवडा” म्हणून साजरा करायचे अवाहन भारतीय जनता पार्टीने केले होते. त्याचाच एक भाग म्हणून भडगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी 53 स्वयंसेवकांनी स्वच्छेने रक्तदान केले.

काटेकोर आरोग्य मुल्यमापनानंतर 53 स्वयंसेवक रक्तदानासाठी पात्र ठरले. या जीवरक्षक उपक्रमात दिलेल्या अमुल्य योगदानाबद्दल प्रत्येक रक्तदात्याला जळगावच्या रेडप्लस ब्लड सेंटरने प्रमाणपत्र दिले. यावेळी पाचोरा विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे, भाजप जिल्हा चिटणीस सोमनाथ पाटील, मार्केट कमिटी संचालक तथा रक्तदान शिबीर संयोजक लखिचंद पाटील, तालुका उपाध्यक्ष श्रावण लिंगायत, रतिलाल पाटील, सैनिक आघाडी तालुकाध्यक्ष समाधान पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष किरण शिंपी, शहराध्यक्ष विशाल चौधरी, शक्तीकेंद्र प्रमुख भगवान पाटील, जगदिश पाटील, कजगाव शहराध्यक्ष रवींद्र पाटील, ग्रा. पं. सदस्य अक्षय मालचे, तांदुळवाडी सरपंच नकुल पाटील, विश्वनाथ भोई, लक्ष्मण पाटील, विशाल पाटील, विकास पाटील, अनील पाटील, कुणाल पाटील सह कार्यकर्ते उपस्थित होते.