भडगाव महाविद्यालयाचे रा.से.यो. शिबीर उत्साहात

0

भडगाव : येथील रजनीताई नानासाहेब देशमुख महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाचे विशेष हिवाळी शिबीर नुकतेच तालुक्यातील दत्तक गाव बाळद खुर्द येथे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ‘क्लीन कॅम्पस मिशन’ ही संकल्पना घेवून उत्साहात पार पडले. शिबीराचे उद्घाटन जवान मनोहर पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी व्यवस्थापन समितीचे चेअरमन नानासाहेब देशमुख हे होते तर प्रमुख पाहुणे सरपंच संजय पाटील, विश्वास पाटील, प्राचार्य डॉ. एन.एन. गायकवाड आदी उपस्थित होते.

विविध विषयांवर केले मार्गदर्शन
शिबीरात संपूर्ण बाळद खुर्द गावाची स्वच्छता करण्यात आली तसेच श्रम संस्कारातंर्गत जलसंधारण बंधारा तयार करण्यात आला. बौद्धीक सत्रात सोशल मिडीयाचा समाजावर परिणाम, जातिमुक्त भारत समृद्ध भारत, अवयवदान श्रेष्ठ दान, वृक्ष संवर्धन व माती परीक्षण, अंधश्रद्ध निर्मूलन- जादुटोणा विरोधी कायदा, स्पर्धा परीक्षा- युवकांसाठी संधी, कॅशलेस सोसायटी आदि विविध विषयांवर तज्ज्ञ वक्त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. समारोप प्राचार्य डॉ एन.एन. गायकवाड यांच्याहस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी संचालक विजय देशपांडे होते. यशस्वीतेसाठी कार्यक्रम अधिकारी प्रा. एम.डी. बिर्ला, सह कार्यक्रम अधिकारी प्रा. एस.एम. झाल्टे, महिला कार्यक्रम अधिकारी रचना गजभिये यांनी परिश्रम घेतले. त्यांना प्रा. भंगाळे, राजु मराठे, रामदास चौधरी, सुनील पाटील, दिलीप चौधरी, मनोहर महाजन यांचे सहकार्य लाभले.