भडगाव – ( भडगाव ) येथील पि. टी. सि. संस्था संचालित सौं रजनीताई नानासाहेब देशमुख महाविद्याल यात प्लेसमेंट सेल व वाणिज्य मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार संधी यां विषयावर विद्यार्थी मेळावा घेण्यात आला यावेळी आकाश आवाडे (स्वतंत्र मायक्रोफिन प्रायव्हेट लिमिटेड) यांचे रोजगार संधी यां विषयावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाणिज्यमंडळ प्रमुख प्रा. सुरेश कोळी हे होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले यावेळी आकाश आवाडे यांनी विद्यार्थ्यांना कोणत्याही पदासाठी फॉर्म भरताना व मुलाखतीच्या वेळी येणाऱ्या अडचणी विषयी मार्गदर्शन केले व सकारात्मक आत्मविश्वास असेल तर यश मिळते असे सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्लेसमेंटसेल विभाग प्रमुख प्रा. डॉ.सुनील शेलार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.डॉ. सचिन हडोळतीकर यांनी तर आभार प्रा.डॉ. गजानन चौधरी यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. बी. एस.भालेराव, प्रा. शिवाजी पाटील, प्रा. डॉ.इंदिरा लोखंडे, प्रा. रचना गजभिये, प्रा. प्रवीण देसले, प्रा.ज्योती नंनवरे, संदीप केदार, अजय देशमुख, दिलीप तडवी, प्रवीण तडवी उपस्थित होते यावेळी मोठया संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनीनी कार्यक्रम चा लाभ घेतला