भडगाव । माजी कृषीमंत्री शरद पवार याच्या वाढदिवसानिमित्त लाडकुबाई विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात यशस्वीनी सामाजिक स्वच्छता अभियान योजना अंतर्गत समन्वयिका तथा नगरसेविका योजनाताई पाटील यांच्यातर्फे विद्यालयास 30 कचराकुंड्या भेट देण्यात आल्या. प्रस्ताविक मुख्याद्यापिका वैशालीताई पाटील यांनी स्वच्छ भारत अभियानाचे महत्व पटवून दिले. शाळा परिसर व वर्ग स्वच्छतेकडे विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियानात सहभागी होण्याचे आवहान करून योजना पाटील यांनी अभियानाच उद्देश सांगितला. सदर कार्यक्रमात प्राचार्या वैशालीताई पाटील यांनी योजनाताईंचा सत्कार केला व योजना पाटील यांनी प्राचार्य वैशाली पाटील यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार केला.