भडगाव येथे गटविकास अधिकारी यांचा सत्कार

0

भडगाव। चांगले काम केले तर निश्चितच त्याची पावती प्रत्येकाला मिळत असते. पत्रकार संघाने बदली झाल्यानंतर ठेवलेला सत्कार हे त्याचेच द्योतक असल्याचे मत गटविकास अधिकारी सुभाष जाधव यांनी व्यक्त केले. ते भडगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने तालुक्यातुन नुकतेच बदलुन गेलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचा निरोप समारंभाचा शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार सी.एम.वाघ होते. व्यासपीठावर पाचोरा तहसिलदार बी.ए. कापसे, बांधकाम विभागाचे उपअभियंता एस.आर.राऊत, मुख्याधिकारी बबन तडवी, नायब तहसिलदार मुकेश हिवाळे, अमित भोईटे, सपोनि रविंद्र जाधव, तत्कालीन पुरवठा निरीक्षक अनिल चौधरी, मंडळधिकारी अंजिक्य आंधळे, पोलिस उपनिरीक्षक पिटारे, सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार हेमंत मोरे, पोलिस नाईक शिंदे, पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष तथा भाजपचे तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष संजय पवार उपस्थितीत होते.

यांची होती कार्यक्रमाला उपस्थिती
कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष व्ही.एस.पाटील, कार्याध्यक्ष भय्यासाहेब पाटील, भाजपा युवामोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील, नगरसेवक प्रशांत पवार, सचिन चोरडीया, नंदकुमार पाटील, नगररसेविका योजना पाटील, पंचायत समीतीच्या सदस्या डॉ. अर्चना पाटील, डॉ. विशाल पाटील, पोलिस पतसंस्थेचे उपाध्यक्ष रविंद्र पाटील, प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विलास नेरकर, प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रविद्र सोनवणे, भिकन पाटील(वडजी), संजय पाटील(बात्सर), संतोष महाजन, जगन भोई, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष दिपक पाटील, भाजपचे शहरध्यक्ष शैलेश पाटील आदि पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पत्रकार सुनिल पाटील, अभार सुनिल कासार यांनी मानले. यशस्वीतेसाठी सर्व पत्रकार बांधव यांनी परीश्रम घेतले.