भडगाव येथे तालुकास्तरीय एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन

0

भडगाव। महाराष्ट्र शासनातर्फे राबविण्यात येणार्‍या अटल महापणन विकास अभियान अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयच्यावतीने करण्यात आले होते. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे संचालक तथा शिवाजी विकासो संस्थेचे चेअरमन नानासाहेब देशमुख होते. कार्यशाळेत सहाय्यक निंबधक एस.एफ.गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. यात अटल महापणन विकास अभियानाचे उदिष्टे, उदिष्ट राबविण्यासाठी करावयाचे उपक्रम, अभियान राबविण्याची कार्यपध्दती आणि अभियानाची अमंलबजावणी याबाबत सविस्तर माहिती दिली.

संस्थेत किमान एक व्यवसाय करण्याच्या सुचना
सदर आभियानामध्ये विविध कार्यकारी संस्था, खरेदी विक्री संघ आणि संस्थांनी त्याचे कामकाजात सुधारणा करुन त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम कशा होतील याबाबतचा कृती आराखडा तयार करण्याबाबत रुपरेषा परस्पर चर्चेअंती ठरविण्यात आला. व प्रत्येक संस्थेने किमान एक नविन व्यवसाय सुरु करण्याबाबत सुचना दिल्यात. सदर अभियानांतर्गत प्रत्येक संस्थेने गाव पातळीवर त्याचे सभासद, बचत गटाचे सभासद आणि शेतकरी यांची कार्यशाळा घेवुन सदर अभियानबाबत मार्गदर्शन करावे. सदर अभियान हे वर्षेभर चालणार असल्याने प्रत्येक संस्थेने अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन सहाय्यक निंबधक यांनी केले. प्रत्येक संस्थेस ठरवुन दिलेले उदिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करण्याची सुचना कार्यशाळेत देण्यात आली. सदर कार्यशाळेस तालुक्यातील विकास संस्था आणि पणन संस्थाचे चेअरमन, संचालक व सचिव उपस्थित होते.