जळगाव । भडगाव शहरात 25 रोजी सायंकाळपासून वीजपुरवठा विस्कळीत झाली आहे. विजपुरवठा होत नसल्याने भडगाव शहरातील नागरिक तीन दिवसापासून अंधारात आहे. तीन दिवस उलटूनही वीजपुरवठा पूर्णपणे सुरुळीत झालेली नाही. उन्हाची तिव्रता अधिक असल्याने आणि त्यातच विज पुरवठा होत नसल्याने संतप्त नागरिकांनी रविवारी 28 रोजी वीज पुरवठा सबस्टेशनवर मोर्चा काढला. वीज पुरवठा सुरळीत का होत नाही याबाबत कंपनी अधिकार्यांना मोर्चेकर्यांनी जाब विचारला. संबंधीत घटनेची माहिती कळताच आमदार किशोर पाटील यांनीही सबस्टेशनला भेट दिली व अधिकार्यांची कानउघाडणी केली. त्यानंतर दुरुस्ती कामाला दुपारी 12 वाजेनंतर सुरुवात करण्यात आले. 25 रोजीच्या वादळ व पावसामुळे परिसरातील अनेक विजेचे खांब वाकून वीज ताराही तुटल्या. यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला होता. विजपुरवठ्या अभावी शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले.