भडगाव येथे नगरपरिषद व भाजप यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान संपन्न

 

भडगाव (प्रतिनिधी) 17 सप्टेंबर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिवस ते 2 आक्टोंबर गांधी जयंती “सेवा पंधरवडा” म्हणून साजरा करायचे आवाहन भारतीय जनता पार्टी व प्रशासनाने केले होते. त्या अंतर्गत स्वच्छता हीच सेवा उपक्रमाचा भाग म्हणून भडगाव नगरपरिषद, भाजप, आदर्श कन्या शाळा व माऊली फॉन्डेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भडगाव गिरणा नदी पात्रातील गणेश विसर्जनानंतर पाण्यातील गणेश मूर्ती व निर्माल्य बाहेर काढून गिरणा नदी व पात्र स्वच्छ केले.
सेवा पंधरवडा अंतर्गत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता 1 तास श्रमदान करण्याचे आवाहन केले होते. या अहवानाला साथ देत वरील संस्था व भाजप भडगाव यांनी संयुक्तपणे हा उपक्रम राबविला. यावेळी मुख्याधिकारी रविंद्र लांडे, भाजप जिल्हा चिटणीस सोमनाथ पाटील, भडगाव तालुका उपाध्यक्ष श्रावण लिंडायत, प्रा.दिनेश तांदळे, प्रा.अतुल देशमुख, माऊली फॉन्डेशनच्या संगिता जाधव, योजना पाटील, प्रतिभा कुलकर्णी, प्राजक्ता देशमुख, नगरपरिषदचे गणेश लाड, तुषार नकवाल, नितीन पाटील, प्रा सुरेश रोकडे, भाजपचे शहराध्यक्ष बन्सीलाल परदेशी, शहर सरचिटणीस प्रमोद पाटील, प्रदीप कोळी, वसंत वाघ, श्याम चव्हाण, भाजयुमो तालुकाध्यक्ष किरण शिंपी, भाजयुमो शहराध्यक्ष विशाल चौधरी, सोशल मीडिया प्रमुख शुभम सुराणा, व्यापारी आघाडीचे तालुकाध्यक्ष विजय वाणी, कार्यालय सहाय्यक कुणाल पाटील, सचिन पवार, जाकीर कुरेशी, शुभम पाटील, सुनील अहिरे, सनी पाटील, आदर्श कश्या शाळेच्या मुली, नगरपरिषद अभ्यासिकेतील विद्यार्थी सह नगरपरिषदचे कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश खोडपे यांनी केले.