भडगाव येथे मुद्रा लोन मेळावा

0

भडगाव : मुद्रा योजनेबाबत परिसरातील तरुणांना माहिती मिळावी व या योजनेचा अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी भडगाव येथे बुधवारी 7 रोजी मुद्रा लोन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. लक्ष्मणभाऊ मंगल कार्यालयात खासदार ए.टी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आमदार किशोर पाटील व आमदार डॉ.सतिष पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा होणार आहे. मेळाव्यात तरुण, छोटे व्यावसायिक, उद्योजक, सुशिक्षित बेरोजगार यांना व्यवसाय, उद्योगधंदा उभा करण्यासाठी मुद्रा लोन योजने अंतर्गत कर्जवितरण बाबत माहिती देण्यात येणार आहे. दरम्यान समन्वय समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ.संजीव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. उपस्थितीचे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी मनिषा खत्री व तहसिलदार सी.एम.वाघ यांन केले आहे.