भडगाव । संत जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या 369 व्या बीज सोहळ्या निमित्त संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व मिरवणुकीचा कार्यक्रम कुणबी मराठा पाटील समाज उत्कर्ष मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. येथील यशवंतनगर भागात प्रतिमा पुजन करुन मिरवणुकीला सुरुवात झाली. पोलीस निरीक्षक दत्तात्रय परदेशी यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी भडगाव चे नगराध्यक्ष शामकांत पाटील, नगरसेवक योजना पाटील, अमोल पाटील, रंजना पाटील, अतुल पाटील, राजेंद्र देशमुख, सुभाष पाटील, संतोष महाजन, जिल्हा पोलीस सोसायटीचे उपाध्यक्ष रवींद्र पाटील उपस्थितीत होते.
मिरवणूक काढून केली सांगता
मिरवणुक शिवनेरी गेट, पाचोरा रोड, बसस्थानक मार्गे मेन रोड, बाजार चौक, खोल गल्ली, रथ मार्गाने भवानी बाग येथे मिरवणुकीची सांगाता करण्यात आली. यावेळी महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. यशस्वीतेसाठी नंदकिशोर आचारी, राजू पाटील, दत्तात्रय पाटील, विजय पाटील, समाधान पाटील, राजू तहसीलदार, खुशाल बंगाले, देविदास पाटील, प्रकाश तहसीलदार, लक्ष्मण खैरनार, सुरेश गंजे, अशोक गंजे, प्रकाश गंजे, ऊत्तम बंगाले, नरेंद्र पाटील आदींनी परीश्रम घेतले.