भडगाव-वाडे बस पुन्हा सुरू करण्याची मागणी

0

भडगाव। गेल्या दीड महिन्यांपासून भडगाव – वाडे बस अचानक बंद झाल्याने विद्यार्थी व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ही बस पुन्हा सुरू करण्याची मागणी येथील माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्या उशाबाई अशोक परदेशी यांनी निवेदनाद्वारे भडगाव बसस्थानक आगार व आमदार किशोर पाटील यांना करण्यात आली आहे. भडगाव-वाडे जाणारी बस महिन्या भरा पासून बंद असल्याने अजूनही बस पुर्वावद झालेली नाही.

14 गावांना प्रवासासाठी मोठी अडचण
भडगाव हुन वाडे सकाळून जाण्यास एकही बस नाही, त्यामुळे दुपारी 1.30 वाजता वाडे बस सोडण्यात येते, त्यामुळे भडगाव हुन सकाळी वाडे जाणार्‍या नागरिकांचे अतोनात हाल होत आहे. प्रवाशांना नहाग पाच तास अडकून राहावे लागते ही बस बंद असल्याने पर्यायाने वडढे, कोटली, निंभोर, देव्हारी, कनाशी, बोदर्डे, लोन पिराचे, गौडगाव, बांबरूड, नावरे, वाडे, टेकवाडे, खेडगाव बुद्रुक यासह 14 गावांच्या नागरिकांना प्रवास करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यांना सकाळी या गावांना जाण्यास वाहन नसल्याने त्यांच्या तारांबळ उडते. जळगाव वाडे बस ही 2 वर्षांपासून बंद झाली. वाडे ते जळगाव सकाळी 6 वाजता सुटणारी बस व जळगाव ते वाडे सायंकाळी 6 वाजता मुक्कामी बस सुरू करण्यात यावी अन्यथा भडगाव तहसील कार्यालयासमोर नागरिकांसह उपोषण करण्याचा इशारा उशाबाई परदेशी यांनी दिला.