भडगाव शहरात गटारीवरील ढाप्याची दुरावस्था

0

भडगाव । शहरातील विविध भागात नगरपरिषदे कडुन काही प्रमाणात काँक्रीटीकरणाचे रस्ते तसेच गटारी केलेली आहेत. मात्र काही ठिकाणी गटारीवरील ढापे तुटलेल्या अवस्थेत आहेत. तर काँक्रीटीकरणाचे रस्यावर देखिल खड्डे पडलेली आहेत. परंतु दुरुस्ती करण्याकडे नगरपरिषदेकडून दुर्लक्ष केले जात असल्यामुळे नागरीकां मध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

यशवंतनगर कडे जाणारा मुख्य रस्त्यावरील शिवनेरी गेट जवळील वडणावरील गटारीवरील ढापा दोन महीन्यापासुन तुटलेल्या अवस्थेत असुन छोटे मोठे अपघात होत आहेत. दहा महिन्यापुर्वी देखिल याच ढाप्याला खड्डा पडला होता. त्यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब कौतिक पाटील यांनी स्वखर्चाने दुरुस्ती केला. परंतु अवजड वाहतुक होत असल्यामुळे पुन्हा खड्डा पडला असुन अवैध वाळु, विटाचे भरलेले ट्रक्टर यावरून जात असल्याने खड्डे पडतात. प्रभागातील लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.