भडगाव शहरात 100 च्या बनावट नोटा चलनात

0

भडगाव । भडगाव व्यापारी क्षेत्रात सद्या 100 च्या बनावट नोटांचा झटका बसत आहे. ठिकठिकाणी दररोजच्या व्यासायिक उलाढालीत नियमित 100 ची बनावट नोट येत असल्याने व्यापारी भयभीत झाले आहे. येथील पाचोरा रत्याजवळील एक हॉटेल मध्ये 100 च्या अनेक नोटा असलेला इसम आढळून आल्याची चर्चा शहरात होती. त्यात दोन ठिकाणी मऊ कागद असलेल्या दोन नोटा शेवटचा क्रमांक 800, 809 ह्या ग्रीन पट्टा बनावट असल्याहून दुकानदाराच्या लक्षात आल्यात, त्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया नाही, त्यामुळे धांदल करून ह्या नोटा चालविण्याचा प्रयत्न फसल्याने ग्राहक ह्या नोटा सुट्टे केले होते? त्यांनि दिले? असे उडवाउडवीची उत्तरे देतात. परत घेऊन पसार होतात. त्यामुळे नागरिकांनी यापुढे 100 च्या नोटा घेतल्या तर थोडं संभाळूनच घ्याव्यात नाहीतर तुम्हालाही 100 ची थाप बसू शकते.