शिंदखेडा । तालुक्यातील शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू असून भडणे येथील शेतकरी कोमलसिंग रजेसिंग गिरासे(वय-41) यांनी आज सकाळी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नसलेतरी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मयत कोमलसिंग गिरासे यांच्यावर सायंकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
खाजगी रूग्णालयात केले होत दाखल
पावसाचा लहरीपणा,शेतीमालाला नसलेला भाव , शेतकर्यांबद्दल शासनाची असलेली अनास्था यामुळे शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू असून आज पून्हा तालुक्यातील एका शेतकर्याने आत्महत्या केली. कोमलसिंग गिरासे हे आज सकाळी भडणे गावातील बागुल यांच्या विहीरी जवळ अत्यवस्थ अवस्थेत आढळून आले. तात्काळ रणसिंग गिरासे व गावकर्यांनी खाजगी वाहनाने त्यांना येथील ग्रामीण रूग्णालयात आणले .डॉ.पुनम बडगुजर यांनी कोमलसिंग गिरासे यांची तपासणी करून गिरासे यांना सकाळी 10 वाजता मृत घोषित केले. कोमलसिंग गिरासे यांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. प्राथमिक माहितीनुसार सदर शेतकर्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समजते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत. .तलाठी कडून 7/12 व कर्जाबाबतचा अहवाल मागविण्यात आला आहे. कोमलसिंग गिरासे यांच्या मृत्यूची खबर रणजित धनसिंग गिरासे यांनी शिंदखेडा पोलिस स्टेशनला दिली. पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद करण्यात आली असून हे.कॉ.पी.सी.निंबाळे अधिक तपास करीत आहेत.