भडणे येथे वर्षानुवर्षांची एक गाव एक होळीची परंपरा कायम

0

शिंदखेडा – काळ झपाट्याने बदलला…बदलत आहे. त्यानुसार सण साजरे करण्याच्या पध्दती, चालीरीती संस्कृतीही लोप पावत असताना दिसून येत आहे. मात्र शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथे ?पुर्वजांपासून सुरु असलेली एक गाव एक होळीची प्रथा आजही कायम असून सर्व गावकरी एकत्र येवून लाकडे गोळा करुन उत्साहात होळी सण साजरा करतात. यंदा गावातील होळी पेटवियाचा मान पोलीस पाटील युवराज माळी यांना मिळाला.

भडणे गाव चार हजार लोकवस्तीचे आहे. गावात विविध धार्मिक कार्यक्रम एकत्रित येऊन साजरे केले जातात हे गावकर्‍यांचे विशेष म्हणजे. एक गाव एक होळी याप्रमाणे सण साजरा केला. सर्व गावकरी सकाळी गावाच्या मध्यभागी असलेल्या मारूती चौकात एकत्र येतात. याठिकाणी शेणाच्या गौर्‍या होळीसाठी जाळण्यासाठी लागणारे साहित्य बाम्बु गोळा करून चौकात आणतात.

मोबदला न घेतात होळीची रचना
एक गाव एक होळी परंपरेप्रमाणे ही होळी रचण्याची म्हणजे तयार करण्यार्‍या मिस्तरी लोकांचीही परंपरा आहे. ही होळी बनविण्यासाठी ते कुठलाही मोबदला घेत नाही. त्याचप्रमाणे गौर्‍या , लाकड , गोळा झाल्यावर सायंकाळी गावातील मिस्तरी एकनाथ,मिस्तरी मुलीधर,अमृता मिस्तरी, स्वतःहून येऊन होळी बनवतात. यंदाही त्यांनी होळी बनविली व दरवर्षी प्रमाणे मदत करून आपला सहभाग नोंदविला.

पूजेचा खर्च ग्रामपंचायतीतून
होळीच्या पूजेच्या सर्व खर्च भडणे ग्रामपंचायत कडून करण्यात येतो. सायंकाळी होळी तयार झाल्यावर भडणे येथील गावातील चौकात पुरोहित आबा कुलकर्णी यांच्या मंत्रोप्पचाराने विधीवत होळी पेटविण्यात येते. दरवर्षी यावर्षी होळी पेटविण्याचा मान पोलीस पाटील यांना मिळाला. पोलीस पाटील युवराज माळी यांच्या हस्ते होळी पेटविण्यात आली. यावेळी भडणेचे लोकनियुक्त सरपंच गिरीष देसले, उपसरपंच अशोक माळी, गोरख पाटील, विठोबा पाटील, भाऊ साहेब निकम, वामनराव देसले यांनी ही होळीची पूजा केली. यावेळी मोठ्या संख्येने बाळ गोपाल मंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.