भन्साळी करणार सुहानाला लाँच

0

मुंबई :सध्या स्टारकिड्स बॉलिवूडमध्ये आपली जागा निर्माण करत असताना दिसून येत आहे. श्रीदेवी ची मुलगी जान्हवी कपुर, चंकी पांडेची मुलगी अनाया पांडे, सैफ अली खानची मुलगी सारा अली खान आता या नंतर बॉलीवूडचे बादशाह शाहरुख खानची राजकुमारी सुहाना खानही आता बॉलीवूड मध्ये एन्ट्री करायला तयार आहे हे तिने नुकत्याच वोग या नामांकित मॅगझीन मधून दाखवून दिले. सुत्रांच्या माहितीनुसार दिग्दर्शक संजय लीला भन्साळी सुहानाचे ग्रॅन्ड लॉन्चिंग करणार आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटातून सुहाना बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याची चर्चा आहे.

आपला डेब्यू काहीतरी वेगळा आणि सर्वांच्या स्मरणात रहावा, अशी तिची इच्छा आहे. त्यामुळे शाहरूखने सुहानाच्या डेब्यूसाठी भन्साळींची निवड केली आहे.