भयंकर : विवाहितेला तोंडीतलाक देत जिवंत जाळण्याचा प्रयत्न

बीड – लग्नानंतर महिन्यभराच्या आत विवाहितेला तोंडी तलाक देऊन अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

ही खळबळजनक घटना बीड शहरातील मामला परिसरात घडली आहे. याप्रकरणी पती सासरा सासू विरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न व मुस्लिम महिला अधिकारांचे संरक्षण 2019 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की 22 ऑक्टोबर 2019 रोजी सौबियाचा सर्फराजशी विवाह झाला होता. लग्नानंतर महिनाभराच्या आत सासरच्यांनी तिला त्रास द्यायला सुरुवात केली. 18 नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता पतीने तिला तलाक दिला त्यानंतर सासरच्यांनी तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.