भय्यू महाराज अनंतात विलीन; मुलीने दिला अग्निडाग

0

इंदोर- अध्यात्मिक संत भय्यू महाराज यांच्यावर आज येथील भमोरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे. दुपारी 2 वाजता त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली आहे. लाखो भक्त साश्रू नयनांनी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमा झाले आहेत. महाराजांच्या निकटवर्तीयांनी सांगितल्यानुसार त्यांची मुलगी कुहू मुखाग्नी देईल. बुधवारी सकाळपासून त्यांचे पार्थिव बापट चौकातील सर्वोदय आश्रमात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. भय्यू महाराजांनी मंगळवारी दुपारी आपल्या सिल्व्हर व्हॅली येथील राहात्या घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती.