भय्यू महाराज आत्महत्याप्रकरणी विनायक दुधाळेला अटक

0

मुंबई : अध्यात्मिक गुरू आणि समाजसेवक भय्यूजी महाराज आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी त्यांचा विश्वासू सेवक विनायक दुधाळेला अटक केली आहे. भय्यूजी महाराजांनी आत्महत्या केल्यानंतर विनायक दुधाळे फरार झाला होता. त्याला जेरबंद करण्यात पोलिसांना आता यश आले आहे.विनायक दुधाळेला अटक करण्यात आल्याने भय्यूजी महाराजांच्या आत्महत्येचे गूढ उकलण्याची शक्यता आहे. आझाद नगर पोलीस ठाण्यात त्याची रवानगी करण्यात आली आहे.

भय्यूजी महाराजांनी 12 जून 2018 ला राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्या का केली? याचे गूढ अद्यापही कायम आहे. त्यांच्या आत्महत्येनंतर याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले गेले. त्यामुळेच पोलीस विनायक दुधाळेच्या शोधात होते. आता त्याच्या अटकेनंतर कदाचित हे गूढ उकलण्याची शक्यता आहे.