इंदोर : भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी शुक्रवारी प्रमुख सेवक विनायक दुधाळे, शरद देशमुख आणि पलक पुराणिक नावाच्या तरुणीला कलम 306, 384 आणि 34 अंतर्गत अटक केली आहे. भैयू महाराज आत्महत्या प्रकरणातील ही पहिली अटक आहे.
भैय्यू महाराजांनी गेल्या वर्षी 12 जूनला घरामध्ये स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. पतीला पलक पुराणिक आणि सेवक विनायक दुधळे, शरद देशमुख ब्लॅकमेल करुन त्रास देत होते असा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे.