भय्यू महाराज शिवराजसिंह चौहान सरकारवर नाराज होते -दिग्विजय सिंह

0

इंदोर-भय्यू महाराज यांनी मंगळवारी इंदूर येथे राहत्या घरी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली. व्यक्तिगत तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोटही लिहून ठेवली होती. भय्यू महाराजांच्या आत्महत्येची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात समर्थकांनी बॉम्बे रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासहित अनेक नेत्यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीचीही मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी भय्यू महाराजांच्या आत्महत्येसाठी शिवराज सरकारला जबाबदार ठरवले आहे. ‘भय्यू महाराज शिवराज सरकारकडून नर्मदामध्ये करण्यात येणाऱ्या बेकायदा उत्खननामुळे चिंतीत होते. तोंड बंद ठेवण्यासाठी त्यांना मंत्रीपदाची ऑफर देण्यात आली होती. त्यांनी ऑफर नाकारली होती आणि मला फोनवर यासंबंधी सांगितले होते’ असे आरोप त्यांनी केले आहे