नवापूर : तालुक्यातील भरडू येथे आदिवासी समाजाचे ग्रामदैवत व कुलस्वामिनी देवमोगरा माता व कालिका माता मूर्तीची स्थापना व प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला. या निमित्ताने भरडू येथे विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहे. या प्रसंगी शनिवारी सकाळी आदिवासी पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चना करुन पंचधातुची आकर्षक अशी देवमोगरा मातेची मुर्तीची दोन अश्व असलेल्या रथावर गावातून मिरवणूक काढण्यात अाली. या वेळी मोठ्या प्रमाणात महिलांसह ग्रामस्थांनी मिरवणुकीत सहभाग घेतला.
विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम
मिरवणुकीच्या मार्गावर शाळेतील विद्यार्थीनी रांगोळी काढून भाविकांनी रथावर फुलांचा वर्षाव केला. घरोघरी गुढी उभारून मनोभावे देवमोगरा देवी मुर्तीची पूजा आरती करण्यात आली. या निमित्ताने गणेश पूजन, कलश पूजन व विविध देवता स्थापना व मुर्तीचा शह्याधिवास ध्यान्यधिवास व रात्री व प्रवचनकार मगनभाई वसावा यांचे सुश्राव्य प्रवचन, भजन कीर्तन होईल. मूर्ती स्थापना, पुर्णाहूती आरती व महाप्रसाद व सोनाळकर सोंगाड्या पार्टीचे आयोजन करण्यात आले. धार्मिक कार्यक्रमाचे प्रधानाचार्य वेदमूर्ती चंद्रकांत महाराज, प्रमोद महाराज व देवमोगरा मंदिर पुजारी शेल्टापाणी ता. अक्कलकुवा यांच्या हस्ते पार पडला.
यांनी केले सहकार्य
कार्यक्रमाचे आयोजन सेवा निवृत्त प्रकल्प अधिकारी गुलाबसिंग वळवी व सेवा निवृत्त बालविकास प्रकल्प अधिकारी कुसुम गुलाबसिंग वळवी परिवारातर्फे केले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी सरपंच दिवाणजी वळवी, सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. एम. गावीत, सरपंच बाबु गावीत, उपसरपंच दासू गावीत, प्राचार्य महेंद्र वळवी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक झिणा वळवी, महेश वळवी, रामसिंग वळवी, विजय वळवी, विष्णु वळवी, जितेंद्र कुवर, कनकसिंग सिसोदे, प्रशांत राजपूत, शरद मोरे, भानुदास गावीत ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, आश्रम शाळेतील शिक्षक व विद्यार्थी आणि ग्रामस्थ मंडळीचे सहकार्य लाभले.