भरणेवाडीत रंगले कार्यकर्ते फोडाफोडीचे नाट्य

0

इंदापूर । गुंतवणू अंथुर्णे, (भरणेवाडी) ता. इंदापूर येथिल दि.20 मे रोजीच्या काँग्रेस पक्ष कार्यक्रमाचे आयोजक व मागील 20 वर्षापासुन राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे निष्ठेने काम करणारे सुनिल उर्फ दिगंबर बडू शिंदे यांनी कार्यक्रमाच्या काही वेळ अगोदर राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का दील्याने कार्यक्रमापूर्वी विरोधकांनी काँग्रेस पक्षाची हवा काढून घेतल्याच्या राजकिय चर्चेला संपूर्ण इंदापूर तालुक्यात मोठे उधाण आले होते. तर काँग्रेस पक्षाच्या गोटात शांतता पसरल्याचे चित्र होते व राष्ट्रवादीच्या गोटात मात्र आंनंदाचे वातावरण होते.परंतु सुनिल उर्फ बंडु शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पक्ष प्रवेश हा केवळ आणी केवळ फक्त औट घटकेचा क्षण म्हणजेच उतावळा नवरा आणी गुडघ्याला बाशिंग असाच ठरल्याने तालुक्यात राजकीय वातावरण ढवळुन निघाल्याचे चित्र बनले होते.

दोन तास आधी केला राष्ट्रवादीत प्रवेश
कार्यक्रमाला दोन तास शिल्लक राहिले असताना सुनिल उर्फ दिंगबर शिंदे यांनी काँग्रेस पक्षातील 20 वर्षाच्या कारकिर्दिला राम राम ठोकत आमदार दत्तात्रय भरणे यांचे समक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.या प्रकाराने काँग्रेस पक्षाला मोठा हादरा बसला ही बातमी सोशल मिडीयाच्या माध्यमातुन क्षणार्धात वार्यासारखी सर्वत्र पसरल्याने काँग्रेस पक्षाच्या पायाखालची वाळुच सरकल्याने हर्षवर्धन पाटलांच्या जंगी कार्यक्रमातील हवाच निघून गेल्याच्या चर्चेला सर्वत्र उधाण आले.तर आयोजकच राष्ट्रवादीत गेल्याने कार्यक्रमच रद्द झाल्याच्या चर्चेचे मोठे पेव संपूर्ण तालुक्यात पसरले होते.

आ.भरणेंनी दिले होते आव्हान
भरणेवाडी येथिल सुनिल उर्फ दिंगंबर बंडू शिंदे हे गेल्या 20 वर्षापासुन राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून काम करत होते. भरणेवाडीचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी मागील काही दिवसापुर्वी हर्षवर्धन पाटील यांना एका कार्यक्रमादरम्यान बोलतान हर्षवर्धन पाटलांना नारळ फोडायची लयीच हौस आहे. आमच्या भरणेवाडीत कार्यक्रम घेवुन दाखवा असे जाहीर आव्हान दीले होते. भरणेंच्या आव्हाहनाचा हर्षवर्धन पाटील यांनी स्विकार करत भरणेवाडीत सभामंडप भुमिपूजन व जाहिर सभा कार्यक्रमाचे जंगी आयोजन करून आमदार दत्तात्रय भरणे यांना त्यांच्याच गावात शह देण्यासाठी हर्षवरार्धन पाटील यांचे निष्ठावान कार्यकर्ते सुनिल उर्फ दिंगबर बंडू शिंदे यांचे नेतृत्वाखाली दिनांक 20 मे रोजी केले होते. या कार्यक्रमासाठी काँग्रेस पक्षाकडून मोठा गाजावाजा करण्यात आल्याने संपूर्ण पूणे जिल्ह्याचे लक्ष या कार्यक्रमाकडे लागले होते.

पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश
परंतु हर्षवर्धन पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांना फोन वरून संदेश पाठवुन कार्यक्रम नियोजित वेळेत होणार असुन सर्व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमास नियोजित वेळेत कार्यक्रम स्थळी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. व ठरलेल्या वेळेत हजारोंच्या संखेने काँग्रेस कार्यकर्ते अंथुर्णे गावात सभेसाठी जमा होवू लागले. काही वेळाने हर्षवर्धन पाटील सुद्धा अंथुरर्णे गावात पोहचले. 20 वर्षे निष्ठेने काम करणारे सुनिल उर्फ दिगंबर शिंदे यांनी हर्षवर्धन पाटील याचेशी चर्चा करून पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश करून एकच खळबळ उडवुन दिल्याने कार्यक्रम आयोजकाच्या या पक्षातून त्या पक्षात व त्या पशक्षातुन पुन्हा काही वेळाने या पक्षात कोलांट उड्या मारल्याने राजकीय चर्चेला वेगळेच वळण लागले होते. तर शिंदे याचां राष्ट्रवादी पक्ष प्रवेश औटघटकेचा ठरल्याने आनेकजनांनी आश्‍चर्य व्यक्त केले.