भरणे यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

0

पुणे । शालेय विद्यार्थ्यांना गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या विविध विषयांवरील प्रश्न विचारून आमदार दत्तात्रय भरणे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसेच विद्यार्थ्यांची प्रगती जाणून घेतली.

इंदापूर तालुक्यातील गोखळी येथे एका कार्यक्रमानिमित्त भरणे आले होते. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या. जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती प्रविण माने, सदस्य अभिजित तांबिले, गुरुकुल विद्या मंदिरचे विश्वस्त भरत हरणावळ, सचिन वाघमोडे, तुकाराम वाघमोडे, सोमनाथ वाघमोडे, अर्जुन वाघमोडे, अशोक वाघमोडे याप्रसंगी उपस्थित होते़ स्थानिक पातळीवरील विषयांपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रश्न विचारून त्यांनी विद्यार्थ्यांची प्रगती जाणून घेतली़ विद्यार्थ्यांनी हजरजबाबीपणे दिलेल्या उत्तरांनी भरणे यांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली़ शिक्षणाबरोबरच सामाजिक, राजकीय क्षेत्रातील घडामोडींची माहिती करून घेण्यास विद्यार्थी इच्छुक असल्याचे यावेळी जाणवले़