मोहिते परीवाराने जपली सामाजिक बांधिलकी
इंदापूर : इंदापूर तालुक्यांतील मौजे भरतवाडी(काटी)येथिल पुणे जिल्हा परीषद प्राथमिक शाळेला कै.नामदेवराव मोहिते यांच्या स्मरणार्थ साहेबराव मोहिते यांनी ई लर्निग संच ह.भ.प.दयानंद महाराज कोरेगावकर यांच्या हस्ते प्रदान केला.
यावेळी ह.भ.प.दयानंद महाराज म्हणाले की,आपल्या मधून देवाघरी निघून गेलेल्या लोकांना हयात कुटुंबातील सदस्यांनी जर सामाजिक बांधिलकी म्हणून कार्य केले तरच त्यांच्या आत्म्याला शांती लाभते,हिच भूमिका साहेबराव मोहिते परीवाराने अवलंबून प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना ई लर्निग संच पुरविला आहे,त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या पध्दतीने शिक्षण घेता येईल. अनेक संतांनी आपला हेतू हा जनसामान्यांच्या साठी ठेवल्यांने धार्मिकतेतून ग्रामीण भागाची संस्कृती आजही टिकून राहिली आहे,युवा पिढी ने संताचे विचार आत्मसात करावे असेही आवाहन दयानंद महाराज यांनी व्यक्त केले.
या वेळी इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती विलासराव वाघमोडे,पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे निमत्रींत सदस्य सोमनाथ वाघमोडे, निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक मोहन गुळवे, जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबीले, इंदापूर तालुका शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन वाघमोडे, मच्छींद्र चांदणे, साहेबराव मोहिते, माणिकराव मोहिते, दिनकर मोहिते, शिक्षक संजय भोसले, यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.