अमळनेर प्रतिनिधी– महामार्गासाठी संपादित जमीन मोबदला प्रकरणी आर्थिक अपहारात धुळे येथील भरत जाधव यास अटक करण्यात आली असून दुसऱ्या दिवशी ही त्याच्याकडून सुमारे 9 लाख हस्तगत करण्यात आले आहेत.
दिनेश ठाकरे याला मिळालेल्या जमिनीच्या मोबदल्यात मिळालेली रक्कम धुळे येथील प्रतिष्टीत व्यक्ती सतीश महाले , विनायक शिंदे, आदिवासी नेता भरत जाधव यांनी परस्पर काढली होती महाले व शिंदे यांना अटक केल्यानंतर भरत यास ताब्यात घेतले होते त्याने पहिल्या दिवशी 14 लाख रुपये मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन केला होता पोलिसांनी सखोल चौकशी केली असता दुसऱ्या दिवशी ही त्याने 8 लाख 83 हजार 500 रुपये पोलिसांच्या स्वाधीन केले परंतु भरत ने सुमारे 38 लाख भ्रमणध्वनी वापरून नेटबँकिंग ने काढले आहेत उर्वरित रक्कम हस्तगत करण्यासाठी पोलिसांनी भरत ला अटक केली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी दिली.