भरदिवसा घरातून लांबवला ऐवज : चारठाण्यातील आरोपीला बेड्या

Rajur Was Robbed of 26,000 In Broad Daylight : The Accused Was Arrested बोदवड : तालुक्यातील राजूर येथे घर बंद असल्याची संधी चोरट्याने साधत 26 हजारांचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी बोदवड पोलिसात राजू दीपा कोळी (47, चारठाणा, ता.मुक्ताईनगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

भरदिवसा केली घरफोडी
या संदर्भात काजल संदीप सिया (23, कुथळे, ता.धुळे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे वडील राजूर येथे वास्तव्यास असून सोमवार, 29 रोजी दुपारी 12.30 वाजता संशयीत राजू कोळी याने 15 हजार रुपये किंमतीची पाच ग्रॅमची सोन्याची पोत, आठ हजार रुपये किंमतीचा मोबाईल, तीन हजार रुपये किंमतीची गॅस हंडी असा एकूण 26 हजारांचा मुद्देमाल लांबवला. तपास हवालदार वसंत निकम करीत आहेत.