फरीदाबाद: भरदिवसा एका गजबजलेल्या ठिकाणी चार युवकांनी एका तरुणीला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
चार हल्लेखोर तरुण मुलीला मारहाण करुन अपहरण करण्याचा प्रयत्न करतात. मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका वृद्धालाही या तरुणांनी मारहाण केली आहे. काही लोकांनी हस्तक्षेप केल्यानंतर त्या मुलीची सुटका झाली.
या घटनेतील मारहाण करणाऱ्या तरुणांना मुलीचे कुटुंबीय ओळखतात. त्यामुळे दोघांच्याही घरच्यांना बोलवून हे प्रकरण शांततेत मिटवण्यात आले. मुलीच्या घरच्यांनी तरुणाविरोधात अद्याप तक्रार दिलेली नाही.