भरदिवसा चोरट्यांनी चोरट्यांनी रीक्षा लांबवली

भुसावळ : भरदिवसा चोरट्यांनी शहरातील जामनेर रोडवरील अष्टभुजा देवीच्या मंदीरामागील कन्हैयालाल प्लॉट भागातून रीक्षा चोरून नेली. शहरातील कन्हैयालाल प्लॉट भागात राजेश पितांबर पाटील यांनी त्यांची 70 हजार रुपये किंमतीची अ‍ॅटोरीक्षा (एम.एच.19 बी.यु.4162) ही लावली असता चोरट्याने सकाळी 12.10 ते 12.20 वाजेच्या दरम्यान लांबवली. राजेश पाटील यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक सुदर्शन वाघमारे पुढील तपास करीत आहे.