नांदेड – किनवट तालुक्यात आज भरदिवसा मुख्याध्यापिकेचा खून केल्याची घटना समोर आली आहे. सुरेखा राठोड असे खून झालेल्या ३२ वर्षीय मुख्याध्यापिकेचे नाव आहे.
शांतीनिकेतन इंग्लिश स्कुलमध्ये सुरेखा राठोड या मुख्याध्यापिका होत्या. गोकुंदा येथील शिवनगरीमधील राहत्या घरी त्यांच्यावर धारदार हत्याराने वार करून हत्या केली. खुनाचे कारण अजून समोर आलेले नाही.