भरधाव आयशरच्या धडकेत भुसावळचा इसम ठार

0

साकेगावजवळ अपघात ; वाहन चालक पसार

भुसावळ ः भरधाव आशयरने धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार तर अन्य एक जण जखमी झाल्याची घटना तालुक्यातील साकेगाव गावाजवळ शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. अपघातानंतर आयशर चालक पसार झाला. सूत्रांच्या माहितीनुसार भुसावळच्या जळगाव रोडवरील मुक्ताई कॉलनीतील रहिवासी असलेले धनराज नारायण बेंडाळे (50) हे नशिराबादच्या गायत्री पेपर मिलमध्ये मॅकेनिक म्हणून कामास आहेत. शुक्रवारी सायंकाळी ते कर्तव्यावरून घरी परतत असताना अज्ञात भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकी (एम.एच.19 ए.डी.3998) ला धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला तर त्यांच्यासोबत असलेला अन्य एक इसम जखमी झाला. मात्र त्यांचे नाव कळू शकले नाही. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक पसार झाला. अपघाताची माहिती कळताच तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुरेश वैद्य व गजानन काळे यांनी मृतदेह जळगावच्या सामान्य रुग्णालयात हलवला.