रावेर- रावेरकडून बर्हाणपूरकडे भरधाव वेगाने जाणार्या आयशर मिनी ट्रक (क्रमांक एम.एच.04-1666) या वाहनाने रावेरकडे येणार्या दुचाकी ( एम.एच.19 बी.टी.9537) कर्जोदजवळ धडक दिल्याने दुचाकीस्वार सुभाष मधुकर महाजन (शिवाजी चौक, रावेर) हा गंभीर जखमी झाला. हा अपघात 25 रोजी दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास झाला. सुभाष महाजन यास उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले.