भरधाव आयशरच्या धडकेने प्रौढाचा मृत्यू : चालकाविरोधात गुन्हा

Accidental Death Of Kapil Nagar Adult : Case Against Eicher Driver भुसावळ : तालुक्यातील कपिल नगर येथील प्रौढाला भरधाव आयशरने उडवल्याची घटना 11 जून 2022 रोजी दुपारी दिड वाजता घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपासाअंती अज्ञात आयशर चालकाविरोधात भुसावळ तालुका पोलिसात सोमवारी रात्री नऊ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. या अपघातात सुपडू उत्तम सुरळकर (45, कपिल नगर, भुसावळ) यांचा मृत्यू झाला होता.

आयशरच्या धडकेने प्रौढाचा झाला मृत्यू
सुपडू सुरळकर हे दुचाकी (एम.एच.19 बी.झेड.7480) ने सरगम गेटकडून कपिल नगरकडे 11 जून 2022 रोजी दुपारी एक वाजता येत असताना आयशर वाहनावरील अज्ञात चालकाने सुरळकर यांच्या दुचाकीला धडक दिल्याने सुरळकर हे डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाले होते व उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली होती.

पोलिस चौकशीअंती गुन्हा दाखल
या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूच्या तपासानंतर सोमवारी रात्री अज्ञात आयशर चालकाविरोधात सहाय्यक फौजदार शामकुमार आत्माराम मोरे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रकाश वानखडे करीत आहेत.