घोडसगावजवळ अपघात ; वाहन चालक पसार, मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा
मुक्ताईनगर- भरधाव आयशर वाहनाने धडक दिल्याने महामार्ग चौपदरीकरणाच्या कामावरील सुरक्षा गार्ड जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी पहाटे पावणेसहा वाजता घोडसगाव बसस्थानकाजवळ घडली. अपघातानंतर वाहन चालक पसार झाला. या अपघातात आनंदा श्रावण सोनवणे (40) यांचा जागीच मृत्यू झाला. अनिल श्रावण सोनवणे (अंजनसोंडा) यांनी मुक्ताईनगर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार महामार्ग चौपदरीकरणाच्या कामासाठी नियुक्त सिक्युरीटी गार्ड आनंदा सोनवणे हे मंगळवारी घोडसगाव बस स्थानकाजवळ रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना आयशर (क्र.एम.एच.43 जी.बी.4447) ने जोरदार धडक दिल्याने सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला. तपास सहाय्यक फौजदार माणिकराव निकम करीत आहेत.