भरधाव ओमनीची दुचाकीला धडक ; लोहार्‍याचे ग्रामपंचायत सदस्य ठार

0

महिला गंभीर जखमी ; कुर्‍हेपानाचेजवळ लग्नाला जाताना अपघात

भुसावळ- तालुक्यातील कुर्‍हेपानाचे गावाजवळ भरधाव ओमनीने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात पाचोरा तालुक्यातील लोहार्‍याचे माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य विठ्ठल दौलत क्षिरसागर (55) हे ठार झाले तर त्यांच्यासोबत असलेल्या महिला तथा अंगणवाडी सेविका निर्मला गणेश चौधरी या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तत्काळ जामनेर उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आल्याचे सांगण्यात आले. शनिवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास कुर्‍हेपानाचे गावापासून काही अंतरावर हा अपघात झाला. अपघातानंतर तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी धाव घेतली.