मुक्ताईनगर महामार्गावर अपघात : अपघातात दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान
मुक्ताईनगर – मुक्ताईनगर महामार्ग क्रमांक सहावरील हाजी एस.एम.जावेद यांच्या पेट्रोल पंपाजवळ मलकापूरकडून भरधाव वेगाने येणार्या कंटेनर (यु.पी.17 टी.6413) ने महिंद्रा स्कार्पियो (एम.एच. 19 सी.एफ.4346) ला जोरदार धडक दिल्याने गाडी रस्त्याच्या कडेला पलटी होवून तीन जण जखमी झाले. मुक्ताईनगर चौफुलीवर मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात चारचाकीतील सचिन नंदू कुमार (34, रा.बोरखेडे), योगेश नथू पाटील (30, रा.बोरखेडे), सतीश दिनकर पाटील (35, रा.अहिरे) जखमी झाले. जखमींवर मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर जळगाव सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. याकामी लक्ष्मण सापधारे व सहकार्यांनी मदत केली.