चाळीसगाव : भरधाव कंटेनरने दुचाकीला दिलेल्या धडकेत चाळीसगावच्या शांतीदेवी पॉलिटेक्नीक महाविद्यालयाचे प्राचार्य जागीच ठार झाले. हा अपघात शनिवार, 9 रोजी सकाळी 11.30 हॉटेल साईवैभव, भोरस गायरानजवळ, धुळे रोडवर ही घटना घडली. दीपक आधार पाटील (45, भामरे, ता.चाळीसगाव) असे मयत प्राचार्यांचे नाव आहे.
दुचाकीला उडवल्याने प्राचार्यांचा मृत्यू
चाळीसगाव तालुक्यातील भामरे येथील रहिवासी दीपक आधार पाटील (45) हे शनिवारी सकाळी 11.30 महाविद्यालयात जाण्यासाठी दुचाकी बुलेट (एम.एच.19 बी.एक्स.6237) ने निघाले असतानाच भरधाव कंटेनर (आर.जे. 14 जी.जे.8508) ने बुलेटला मागून जोरदार धडक दिल्याने दीपक पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती कळताच ग्रामीण पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत कंटेनर ताब्यात घेतला. प्राचार्यांच्या अपघाती मृत्यूमुळे भामरे गावात शोककळा पसरली. मयत प्राचार्य यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परीवार आहे.