भरधाव कंटेनरच्या धडकेत शाखा अभियंत्याचा मृत्यू

0

जळगाव । पाचोरा पोलिस स्थानकात कार्यरत असलेले पोलिस कर्माचारी अनमोल पटेल यांचे लहान बंधू तसेच महाराष्ट्र जिवन प्राधिकरण विभगात कार्यरत असलेले शाखा अभियंता हे एरंडोल येथून कामावरून जळगाव येथे घरी येत असतांना मागुन भरधाव येणार्‍या कंटेनरने दोन दुचाकारीस्वारांना उडविले. या अपघातात शाखा अभियंता यांचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.

सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र जिवन प्राधिकरण विभागत एरंडोल येथे कार्यरत असलेले शाखा अभियंता नाजीर सत्तार पटेल (वय अंदाजे 42) हे आपले दैनंदिन कामकाज आटोपून बुलेट क्र. (एमपी 09 एनडब्ल्यू 2030)ने घरी जळगावकडे येत असतांना वाटेत असलेल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापिठजवळ मागून येणार्‍या भरधाव कंन्टेनरे जोरदाध धडक दिल्याने ज्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच बुलेटच्या पुढे एक मोटारसायकलस्वार देखील जात असतांना त्यालाही जोरदार धडक दिल्याने त्याला देखील शहरातील गणपती रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मयत नाजीर पटेल हे पाचोरा येथील पोलिस कर्मचारी अनमोल पटेल यांचे बंधू आहेत. यांचा मृतदेह जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघात झाल्याचे कळताच मयताचे भाऊ व नातेवाईकांना जिल्हा सामान्य रूग्णालयात एकच धाव घेतली.