जळगाव – आईला दवाखान्यातून तपासणी करून परत एरंडोलकडे जात असतांना पिंपळकोठ्याजवळ मागून येणाऱ्या भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास घडली असून जखमीस खासगी रूग्णालयात दाखल केले आहे. याबाबत माहिती अशी की, नितीन मधुकर शिंपी (वय-40) रा. एरंडोल हे त्यांच्या आईला दवाखान्यात तपासणीसाठी मंगळवारी दवाखान्यात आणले होते. आई मालतीबाई मधुकर शिंपी यांची तपासणी करून एरंडोलकडे दुचाकीने नितीन शिंपी आईसह निघाले. दरम्यान पिंपळकोठा येथे आल्यानंतर मागून येणाऱ्या भरधाव वेगाने येणारी कार क्रमांक एमएच 15 जीएल 2355 ने जोरदार धडक दिल्याने ते दुचाकीवरून जमीनवर पडले. यावेळी कार चालकाने माणूसकी दाखवत दुचाकीस्वार नितीन शिंपी यांना जखमी अवस्थेत तातडीने त्याच कारमध्ये बसून शहरातील खासगी रूग्णालयात दाखल केले.