भरधाव कार पुलावरुन कोसळली

0

मुंबई – मुंबईत भरधाव वेगाने जाणारी कार पुलावरुन खाली कोसळली. पुलावरुन खाली कोसळण्यापूर्वी कारने एका टेम्पोला धडक दिली आणि बॅनर लावणार्याल एका व्यक्तीलाही चिरडले. यात त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे.
वांद्रे येथील कलानगर जवळील ही घटना घडली. त्यामुळे चालक महिला गंभीर जखमी झाली आहे. भरधाव वेगात कार चालवणारी महिला आणि तिची मुलगी या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर बॅनर लावणार्याा व्यक्तीला नाहक आपला जीव गमावावा लागला आहे.