डोंगरगाव रस्त्यावर मद्यधूंद कार चालकांचा धिंगाणा ; दोघांना पोलिसांनी केली अटक
शहादा- शहरातील डोंगरगाव रस्त्यावर अल्टो कारने दुचाकीला धडक दिल्याने दोन जण जखमी झाले तर या अपघातात अल्टो कारचा चालक व त्याचे सहकारी मद्याच्या नशेत असल्याने गाडीवरचा ताबा सुटुन रस्त्यावर वाहने दोन वेळा उलटले. संदीप रुपसिंग चव्हाण (रा.कुढावद, ता.शहादा) व विनोद सुदाम ठाकरे (रा.कोचरा, ता.शहादा) हे अल्टो कार (एम.एच.12 डी. ई. 9807) ने डोंगरागावकडे जात असताना समोरुन येणार्या दुचाकी (एम.एच.39- 8806) ला जोरदार धडक देण्यात आली. त्यात दुचाकीस्वार गंगाधऱ माळी हा जखमी होवून रस्त्याच्या कडेला फेकला गेला तर कारचे पुढील टायर फुटल्याने कार दोन वेळा पलटी झाला. हा अपघात 7 मे रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास झाला. अपघातस्थळी मोठी गर्दी झाली होती मात्र संदीप चव्हाण व विनोद ठाकरे हे दारुच्या नशेत अक्षरशः रस्त्यावर धिंगाणा करत होते व मदत करणार्याना शिवीगाळ करत होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर कॉन्स्टेबल राहुल बोराडे यांनी फिर्याद दिल्यावरून शहादा पोलिसात विनोद सुदाम ठाकरे व संदीप रुपसिंग चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा करून त्यांना अटक करण्यात आली. अपघातात गंगाधर माळी, विनोद ठाकरे जखमी झाले आहेत.